श्यामची आई पुस्तक सारांश | Shyamchi Aai Book Review In Marathi

Shyamchi Aai Book Review In Marathi – नमस्कार, कोठेही न मागता भरभरून मिळालेलं ज्ञान म्हणजे आई. विधात्याच निर्फेळ वरदान म्हणजे आई. आई हे एक अस रसायन आहे जे प्रत्येक वयाच्या माणसाला भुरळ पाडतं. मग आपली चित्रपट सृष्टी सुद्धा कशी त्यापासून मागे राहील. आपण जेव्हा चित्रपट बघतो त्यामध्ये आईची कारकीर्द सुद्धा मस्तच निभावलेली असते. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की प्रत्येकाच्या मनात आईची एक संपूर्ण संकल्पना असते जे आपण पाहतो अनुभवतो त्यातच खरं प्रेम. कारण आई म्हणजे हे निसर्ग सृष्टीला पडलेलं अस एक सुंदर असं स्वप्न ज्यात प्रत्येक जण आपापल्या भाव विश्वात स्वतंत्रपणे जगतात. तसच एक आईरूपी स्वप्न पडलं ते ह्या साहित्य सृष्टीला आणि ते म्हणजे श्यामची आई .

जशी प्रत्येक क्षेत्रात अढळ स्थानावर ती पूर्ण स्वरूप व्यक्ती असते तशी आईरूपी शुक्रताऱ्यासारखी अढळ आहे ती म्हणजे श्यामची आई. तर मित्रहो आज तुम्हाला सांगणार आहोत श्यामच्या आई (Shyamchi Aai) ह्या पुस्तकाबद्दल.

Overview : श्यामची आई पुस्तक | Shyamchi Aai Book

लेखक साने गुरुजी
पृष्ठे256
प्रकाशनपुणे विद्यार्थी गृह
श्यामची आई पुस्तकाची किंमतRs.107/-

श्यामची आई पुस्तक सारांश | Shyamchi Aai Book Review In Marathi

Shyamchi Aai Book Review In Marathi – नमस्कार मित्रांनो , स्वागत आहे तुमचे वर यावेळी आपण ज्या पुस्तकाविषयी सांगणार आहोत त्याला वयाचं बंधन नाहीये. कुठलीही जात , धर्म ,पंत, किंवा भाषा त्याला अडवू शकत नाही कारण विषय आहे तो म्हणजे आईचा. मूल कोणतंही असो ते छोट असो किंवा मोठं. आई हि त्याच्यासाठी सर्वोच्च असते. आपण कितीही मोठे झालो ना पण आईपेक्षा काही मोठं होता येत नाही. प्रत्येक आई आपल्या मुलावर सगळ्यात जास्त प्रेम करते आणि म्हणून प्रत्येक मुलाला वाटतं आपली आई हि जगातली बेस्ट आई आहे. हे जो पर्यंत प्रत्येकाला वाटतं ना तो पर्यंत मुलाच्या आणि आईच्या नात्यात जन्मो जन्मा पर्यंत कुठलीही बाधा येणार नाही हे लक्षात असू द्या.

असं म्हणतात की, परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी काही पोहोचता आल नाही आणि म्हणून प्रत्येक घरात त्याने आई निर्माण केली. जसा सृष्टीचा निर्माता तो, तशीच घराची निर्माती ती. आई ह्या शब्दाची फोडच बघाना आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर त्याच आईच वर्णन करणार जगप्रसिद्ध पुस्तक आपण परीक्षणा साठी घेणार आहोत.

पुस्तक आहे ते म्हणजे, आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलेलं साने गुरुजी लिखित Shyamchi Aai. ह्या पुस्तकाचं नाव ऐकलं रे ऐकलं मनात एक पवित्रतेची भावना निर्माण होते. या पुस्तकात नेमकी काय जादू आहे माहित नाही पण जे काही आहे ते अफाट आहे, अद्भुत आहे आणि तितकंच गोड आणि निरागस सुद्धा आहे. खरं तर सध्या सोप्या गोष्टीतून तत्व ज्ञान मांडत जाताना हे पुस्तक इतकी सहजता कशी राखू शकते हे एक उमगलेलं कोडंच म्हणावं लागेल. पण गुरुजींच्या लिखाणात ती जादू आहे हे आम्हाला वाटतं. गुरुजींनी ज्या प्रकारे पुस्तकाचं लिखाण हाताळल आहे त्याला तोड नाही.

वाचा – अग्निपंख पुस्तक सारांश

श्यामची आई पुस्तकाच्या लेखकाबद्दल माहिती | About Writer Of Shyamchi Aai Book In Marathi

खरंतर पुस्तकाच्या परीक्षणा आधी पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. श्यामची आई पुस्तकाचे लेखक साने गुरुजी (shyamchi aai book writer) म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म कोकणातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 साली झाला. गुरुजींच्या आईच नाव होत यशोदा. लहान पणापासूनच त्यांचं आईवर फार प्रेम. अतिशय हलाकीच्या परिस्थिती त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आणि आयुष्याच उत्तरार्ध हा स्वतंत्र चळवळीत आणि स्वतंत्र सेवेत व्यथित केला. त्यांच संपूर्ण लेखन हे समाजाचं सार्थक करण्यासाठीच केलं असावं अस जाणवत. त्यांनी अनेक कादंबऱ्या , लेख , काव्य, नाटकं लिहिली, त्यामधून प्रेम स्नेह भावना वाहतात . ते लहान बालकांमध्ये अधिक लोकप्रिय होते आणि त्यांच्यामुळेच पुढील अनेक पिढ्या नुसते वाचनाने संस्कारक्षम झाले आहे असं म्हणता येईल.

वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi 

श्यामची आई पुस्तकाबद्दल काही मनोरंजक गोष्टी | Interesting Facts About Shyamchi Aai Book In Marathi

ह्या पुस्तकाची गंमत म्हणजे हे पुस्तक गुरुजींनी नाशिक येथील तुरुंगात अवघ्या पाच दिवसात पहाटे आणि रात्री काम करून उरलेल्या वेळात लिहिलेलं आहे. आणि या वरूनच त्यांच्या अफाट सिद्धेची कल्पना येऊ शकते. पुस्तकाचं मुखपृष्ठ असं सुंदर आहे की ते बघताच आपण एक विश्वात जातो. पुस्तकाची बांधणी अतिशय मजबूत आहे आणि त्यापेक्षाही मजबूत आहे ते म्हणजे पुस्तकामधील उपदेश.

या पुस्तकाची प्रस्तावना आचार्य आत्रे यांनी अत्यंत सुंदर शब्दात केलेली आहे. ती प्रस्तावना वाचतानाच पुढचं पुस्तक वाचण्याची घाई होते. आणि कधी गुरुजी आपल्या वाणीने गोष्टी सांगतात असा उत्साह निर्माण होतो. पुस्तकाचं नाव श्यामची आई असलं तरी वर वर पाहता पटकन श्याम हा पुस्तकाचा नायक आहे हे समजण्याची चुकी करू नका. तर श्याम हे सर्वनाम वरती वापरल्याने श्यामची आई हि खरी नायिका आहे. एक संस्कार प्रधान आई हि एका कथेची नायिका असू शकते हे कदाचित अभावानेच भारत सोडून इतर देशात घडेल.

या पुस्तकात फक्त हि श्यामची आई राहत नाही ती हळू हळू सगळ्यांचीच आई होते. ती फक्त श्याम ला ओरडत नाही किंवा तिचे उपदेश हे फक्त श्याम साठी नसतात तर ते आपोआप आपले होत जातात. तिथे आपण आपली आई शोधतो आणि बऱ्याचदा ती आपल्याला सापडते. कारण प्रत्येक भारतीय आई हि कमी जास्त प्रमाणात सारखीच असते त्यामुळे ही श्यामची आई फक्त श्यामची आई ना राहता प्रत्येक भारतीयांची आणि जगाची आई झाली. आणि प्रत्येकाला तिने घराघरात जाऊन घडवलं. हि कमाल गुरुजींच्या लेखनामुळे आहे.

त्यामुळेच आईच्या संस्कारासोबत गुरुजींच्या लेखनाचं देखील मोठा वाटा आहे. यामधल्या काही कथा प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी वाचणं आवश्यक आहे. जस कि मुकी फुल. स्वावलंबनाची शिकवण, तू वयाने मोठा नाहीस, ह्या त्यापैकी काही कथा. गुरुजींची भाषा ही साधी सोपी असली तरी तिला धार आहे. त्यामुळे प्रत्येक मनासाठी धाव घेते आणि मनामना मध्ये घर करते. त्यामुळे एकदा वाचलेल्या गोष्टी ह्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि काही प्रसंगात धावून सुद्धा येतात. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.

Download Here – Shyamchi Aai Book Pdf In Marathi

हे पुस्तक वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आमच्या इतर बुक्स,

FAQ – Shyamchi Aai Book Review In Marathi

1. श्यामची आई ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– साने गुरुजी हे श्यामची आई पुस्तकाचे लेखक आहे.

2. श्यामची आई पुस्तकाची किंमत किती आहे?

– श्यामची आई पुस्तकाची किंमत Rs.107/-

3. श्यामची आई पुस्तक कधी लिहिले गेले?

– सन १९३५

Thank You.

Team, 360pdfs.com

आमच्या इतर पोस्ट,

4 thoughts on “श्यामची आई पुस्तक सारांश | Shyamchi Aai Book Review In Marathi”

Leave a Comment

close