(Free PDF) श्री स्वामी समर्थ अष्टक PDF | Shree Swami Samarth Ashtak PDF In Marathi Download

Shree Swami Samarth Ashtak PDF In Marathi Download – श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी स्वामी समर्थ अष्टक मंत्र आम्ही आपणाला उपलब्ध करून दिले आहेत . स्वामी समर्थ अष्टक मंत्र PDF डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि मराठी भाषेत लिहिलेले सुंदर (Swami Samarth Ashtak PDF) पीडीएफ मिळवा.

श्री स्वामी समर्थ अष्टक मंत्राला असें पातकी दीन मीं स्वामी राया असे गीत सुद्धा म्हणतात. स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे परंपरेचे भारतीय आध्यात्मिक गुरु होते, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जाते. अकोलकोट हे महाराष्ट्रातील मराठवाडा येथील एक लोकप्रिय गाव आहे. देशभरातून अनेक भक्त स्वामींचा दर्शनासाठी तिकडे येत असतात. आणि दर गुरुवारी स्वामी समर्थ केंद्रात या मंत्राचा जप केला जातो किंवा म्हंटला जातो.

Overview – Swami Samarth Ashtak PDF

PDF Nameश्री स्वामी समर्थ अष्टक
No. of Pages2
PDF CategoryReligion And Spirituality
LanguageMarathi

Swami Samarth Ashtak (Stotra) Lyrics In Marathi

असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||

मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला |
नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||

मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||

कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||

मला एवढी घाल भीक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||

|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||

Download Here – Swami Samarth Ashtak Mantra In Marathi

Thank You,

आमचे इतर PDF देखील बघा

Leave a Comment

close