पोस्ट ऑफिस विमा योजना संपूर्ण माहिती | Post Office Accidental Scheme Pdf In Marathi | Post Office Accidental Scheme In 399 Pdf In Marathi

Post Office Accidental Scheme Pdf In Marathi- आजच्या काळात आरोग्य विम्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे, अनिश्चिततेच्या काळात वाईट काळासाठी तयार राहणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार बदलतो. महागडा विमा घेतला तर त्याचा हप्ताही महाग असतो. यामुळे अनेक वेळा लोक आरोग्य विमा काढण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन, इंडिया पोस्टद्वारे Indian Post Office (Post Office Yojana) एक समूह विमा संरक्षण योजना प्रदान केली जाते ज्यामध्ये तुम्हाला 299 आणि 399 सारख्या अत्यंत कमी प्रीमियमसह रु. 10 लाखांपर्यंतचे कव्हर दिले जाते. हा विमा केवळ अपघाती मृत्यू किंवा आपल्याला दुखतात झाली कुठे अपघातात जखमी झालात तर हा विमा लागू होतो.

Post Office Yojana - 399 insurance policy

Information About Post Office Accidental Scheme In Marathi | पोस्ट ऑफिस विमा योजनेबद्दल माहिती

Post Ofiice Insurance Scheme – ही योजना इंडिया पोस्ट ऑफिस (India Post Office) आणि टाटा एआयजी (TATA AIG) यांच्यात एक समन्वय किंवा टायप होऊन हि योजना अमलात आणली आहे. ही योजना 18 ते 65 वर्षांपर्यंतचे लोक कोणत्याही अपघाती किंवा अन्य कुठलाही दुर्घटना झाल्यास ह्या विम्याचा लाभ घेऊ शकतात.

ह्या विमा कव्हर च्या अंतर्गत अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा शरीराचा कोणत्याही भाग पूर्ण अपंगता, किंवा प्यारालिज्ड झाल्यास त्यावर 1 लाख रुपए पर्यंतचे कव्हर आहे. ह्या विम्याला १ वर्षानतंर पुन्हा तुम्हाला रीन्यू करावा लागणार. त्याच्यासाठी इंडिया पोस्ट खाते असणे आवश्यक आहे, Indian Post Payment Bank (IPPB ) अश्या नावाचे एक खाते प्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडावे लागेल, आणि नंतर तुम्ही अपघाती विम्यासाठी अर्ज करू शकतात.

Benefits Of Post Office Accidental Insurance Scheme In Marathi | पोस्ट ऑफिस अपघात विम्याचे फायदे

पोस्ट ऑफिस योजनेच्या या विम्याअंतर्गत, 399 रुपयांच्या प्रीमियम विम्यामध्ये काही इतर फायदे देखील दिले जातात, जसे की 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाखांपर्यंत, 10 दिवस रुग्णालयात 1000 दैनंदिन खर्च, दुसऱ्या शहरात राहणाऱ्या कुटुंबासाठी वाहतूक. 25,000 रुपयांपर्यंतचा खर्च आणि मृत्यू झाल्यास 5,000 रुपयांपर्यंत अंत्यसंस्काराचा खर्च. या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. या विम्यामध्ये व्यक्तीला रूग्णालयातील उपचारांसाठी रु. 60,000 आणि अपघात झाल्यास IPD आणि OPD मध्ये रू. 30,000 दिले जातात.

तुम्ही अधिक योजना बघू शकतात :-

What Is TAG? | TAG काय आहे

भारतीय डाक विभागीय अंतर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे एक डिजिटल बँक अकाउंट असून ह्या IPPB मध्ये आपले खाते असणे आवश्यक आहे. हा अपघाती विमा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मार्फत हा अपघात विमा टाटा जनरल इन्शुरन्स या कंपनीचा आहे. या विम्याचे नाव टाटा ऍक्सिडेंटल गार्ड (TAG) असे आहे.

Post Office Accidental Insurance Coverage | उपलब्ध कव्हर

अपघाती मृत्यूरु,१०लाख चे संरक्षण
कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वरु,१०लाख चे संरक्षण
अपघातात शरीराचे अवयव निकामी झाल्यासरु,१०लाख चे संरक्षण
अपघातामुळे लागणार वैद्यकीय खर्च (आंतररुग्ण )रु,६०००० पर्यंत
अपघातामुळे लागणार वैद्यकीय खर्च(बाह्यरुग्ण )रु, ३०००० पर्यंत

याव्यतिरिक्त रुपये, ३९९ प्लॅनधारकांसाठी खालील प्रमाणे अजून काही कव्हर उपलब्ध करुन दिले आहेत.

  • अपघातात मृत्य झाल्यानंतर नंतर दोन मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार.
  • रुग्णालयात ऍडमिट असल्यावर दररोज खर्चासाठी १० दिवसापर्यंत रोज १००० रुपये दिले जाणार.
  • कुटुंबाच्या वाहतुकीचा खर्च रुपये २५००० पर्यंत दिले जाणार.
  • अपघाती मृत्यू नंतर अंत्यसंस्कारासाठी रुपये ५००० पर्यंत मदत दिली जाणार.

How To Get Post Office Accidental 399 Insurance Scheme In Marathi | अपघाती ३९९ विमा कसा घ्यावा?

आपल्या गावात किंवा आपल्या शहरात काही अंतरावरच भारतीय डाक च्या शाखा असतात. आपल्या पोस्टमन मार्फत, आपल्याला इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ह्या खात्यातून हा विमा घेता येतो. पोस्टमन त्यांचा जवळ असलेल्या मोबाइल(device) मधून Micro ATM मध्ये आपली विमा पोलिसी बनवून देतात.

यासाठी आपले IPPB हे डिजिटल अकाउंट असणे गरजेचं आहे. ह्या खात्यावरून आपण आपला आणि आपल्या परिवाराचा विमा काढून घेऊ शकतात, ह्यासाठी तुम्हाला खात्यात किमान ५०० रुपये पर्यंत पैशे आपल्या खात्यात टाकणे गरजेचे आहे. आणि यासाठी आपल्या जवळ आपला मोबाईल, आधारकार्ड, आणि पॅन कार्ड हे कागदपत्र असणे आव्यश्यक आहे.

FAQ- Post Office Accidental Scheme Pdf In Marathi

पॉलिसि कशी मिळते?

ग्राहकाला पॉलिसि कागदपत्र (Documents) ची लिंक ७-८ दिवसात sms किंवा ईमेल वर येते. तिकडून तुम्ही PDF स्वरूपात पॉलिसि डाउनलोड करू शकतात. किंवा तिची प्रिंट देखील काढू शकतात पॉलिसि कशी मिळते

पोलिसी ऑटो रिन्यूअल कशी करायची?

सध्या ऑटो रिन्यूअल साठी कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नसून, तुम्ही फक्त जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाणून आपल्या IPPB खात्यात पैसे जमा करू शकतात.

विमा चालू होण्यासाठी किती कालावधी लागतो?

हि विमा पोलिसी काढल्यावर लगेच कव्हर सुरु होतो, तुम्हाला त्यासाठी थांबण्याची गरज नाही.

धन्यवाद,,

Leave a Comment

close