मृत्युंजय पुस्तक सारांश | Mrityunjay Book Review In Marathi

Mrityunjay Book Review In Marathi – नमस्कार मित्रांनो, 360pdfs वर तुमचे स्वागत आहे . आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या पुस्तकाचं परीक्षण. तुम्हाला प्रश्न पडू शकतो, आम्ही हेच पुस्तक का निवडलं? तर याच उत्तर ह्या जगात गूगल वर सहज भेटेल. जेव्हा आम्ही गूगल वर सर्वोत्कृष्ट दहा मराठी पुस्तकाबद्दल माहिती घेतली तेव्हा त्या पुस्तकामध्ये मृत्युंजय कादंबरी अग्र स्थानी होती.

या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठाचा 1996 सालचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर देशभरातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून याच्या केलेल्या भाषातरणा सुद्धा बऱ्याच ठिकाणी गौरवण्यात आलेले आहे. तर एवढ्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला Mrityunjay Book Review In Marathi ह्या पुस्तकाचे परीक्षण करून देत आहोत.

Overview – Mrityunjay Book In Marathi

लेखकशिवाजी सावंत-Shivaji Sawant
भाषामराठी
एकूण पृष्ठे801
किंमत450/-
Categoryकादंबरी(Novels)

मृत्युंजय पुस्तक सारांश | Mrityunjay Book Review In Marathi

Mrityunjay Book Review In Marathi – बरेच वाचक या कादंबरीला देखणी कादंबरी असे म्हणतात. त्याची कारणे अनेक जरी असली तरी त्या पैकी सर्वात महत्वाच कारण म्हणजे पुस्तकात जिवंत भास निर्माण करणारी चित्रे. पुस्तकाच मुखपृष्ठ अतिशय सुभक असून दानवीर तसेच धैर्यवीर कर्ण स्वर्गीय दीनानाथ दराल यांनी साकारले आहे. मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्तीचा फोटो देखील आहे. मृत्युंजय या पुस्तकाचं नाव कर्णाच्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे हे जाणवत. मृत्यूच्या दारात सुद्धा ज्याने जीवनाचा धुंद विजय अनुभवला म्हणूनच त्याचे नाव मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा.

पुस्तकाला पाहता पुस्तक जाड आणि मोठं वाटतही असेल पण एकदा ते वाचायला सुरुवात केल्यावर घाई लागते. पुस्तकाचं जाडपणाचं भूत आपोआप उतरत. सावंतांनी हे पुस्तक मायभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थ पतन पावणार्यांना शूरवीरांना अर्पण केले आहे. पुस्तकाची प्रस्तावना आणि त्याचा अर्थ मोठा लाघवी आहे. अर्धदान येथे लेखकाची वाचकाप्रति आणि मदतनीस प्रति समर्पणाची भावना दिसून येते.

या पुस्तकाच्या वाचनाचा प्रवास जर तुम्हाला सुरु करायचा असेल तर आपल्याला याबद्दल थोडी माहिती हवी. हे पुस्तक जरी कर्ण ह्या व्यक्ती रेखेभोवती फिरत असले तरी त्याला अनेक भाग आहे. मुळात हे पुस्तक महाभारतातील महत्वाच्या व्यक्ती रेखांच्या स्वागताचा सरीपाट. कर्ण, कुंती, दुर्योधन, श्री कृष्ण या सर्व व्यक्तींची स्वगत म्हणजे हे पुस्तक. पण हे नुसती स्वगत नाही तर त्या स्वगतामधून कर्णाच्या जीवन परिचयाचा उलगडा होतो. याचाच अर्थ आपण कर्ण या व्यक्तिरेखाकडे फक्त आपल्या नजरेतून न पाहता श्री कृष्ण सोबत सगळ्यांच्याच नजरेतून पाहू शकतो. आणि हीच ह्या लेखकाची प्रतिभा आहे.

जशा व्यक्ती रेखा बदलता तसे वाचणारे आपण, आपण स्वतः ना राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो. आपण स्वतःला विसरून कधी तरी कर्ण कधी दुर्योधन तर कधी श्री कृष्ण सुद्धा होतो. वाचकाला इतकी अचूक अनुभूती देण्याचं सामर्थ्य फार कमी लेखकांकडे असते. लेखक शिवाजी सावंत यांचे हे फार मोठे यश आहे. वाचकाला पूर्णत्व देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. एक एक व्यक्तिरेखा अर्थपूर्ण , अभ्यासपूर्ण त्यांच्या शैलीमध्ये लिहिले गेले आहे. लेखकाने सर्व ठिकाणांचा पात्रांचा त्यांच्या शरीर रचनेचा स्वभावाचा अगदी निर्जीव गोष्टींचा परिचय नजरे समोर जिवंत उभा राहावा असा केलेला आहे.

एकूणच हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या आयुष्यात विशेष बदल घडेल. तुम्ही जी कोणी स्वतंत्र व्यक्ती असाल ती नक्कीच या पैकी एका पात्राला जोडू पाहते. ते नातं जोडले गेल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून नवा दृष्टीकोन सापडू शकतो यात शंकाच नाही.

वाचा – अग्निपंख पुस्तक सारांश

लेखक शिवाजी सावंत यांच्याबद्दल माहिती | Information About The Author Shivaji Sawant

लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर मध्ये 1940 साली झाला. कोल्हापूर मध्येच 20 वर्षे ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याच प्रमाणे त्यांनी पुण्यात महाराष्ट्राच्या शासनात लोकशिक्षण मासिका करता सहा वर्षे काम पाहिले. भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल सावंताना पूर्वी पासूनच अभिमान आणि जिज्ञासा होती. त्यामुळे माझा भारत म्हणजेच महाभारत हे समीकरण त्यांच्या मनात एकदा पक्क झाल्यानंतर त्यांनी महाभारताचा अभ्यास चालू केला.

त्या दरम्यान त्यांनी कथानायक कर्णाची ओळख व्हावी म्हणून मध्य भारत, उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा प्रदेशांमध्ये स्वतः जाऊन तेथे अभ्यास केला. संदर्भ गोळा केले. आणि इतक्या अथक प्रयत्नानंतर हि कादंबरी आज तुम्हा आमच्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

पुस्तकामधून मिळालेले ज्ञान

1. मृत्युंजय पुस्तक
ए सॉन्ग ऑफ आइस अँड फायर (GoT) प्रमाणेच या पुस्तकात ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ शैलीतील अध्याय आहेत आणि ते १९६० च्या दशकात लिहिले गेले होते. मी वाचलेले हे पहिले मराठी पुस्तक. ते पूर्ण व्हायला मला खूप वेळ लागला असला तरी एका पानाचा मला कधीच कंटाळा आला नाही.

2.आयुष्य हे धूसर आहे.
बरोबर किंवा चूक असे काहीच नाही. कधीच एका व्यक्तीची चूक नसते. यश आणि अपयश या दोन्हीकडे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

3.कधीही मूर्ख होऊ नका.
कर्ण जेव्हा तो दुर्योधनाच्या ऋणात जीवन जगतो. पण शेवटी त्याचा अहंकारच आडवा येतो.

4.जो अन्याय दिसतो त्याच्यासाठी उभे रहा.
द्रौपदीचे वस्त्रहरण हा महाभारतातील जलसमाधीचा क्षण होता आणि कर्णाने हस्तक्षेप केला नाही हे जाणून निराशा होते.

5.जेव्हा लोक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्यासाठी चांगले असतात तेव्हा त्यांच्याबद्दल संशय घ्या.

6.अभिमान तुमचा पतन आणतो.
कर्ण हे तुमच्या आयुष्यातील सर्व काही असूनही ते सर्व काही उत्कृष्ट पद्धतीने मांडण्याचे एक प्रमुख उदाहरण आहे. त्याचा अभिमान आणि अहंकार यामुळेच त्याला प्रथम दुर्योधनाकडे वळवले, परंतु नंतर, दुर्योधन प्रत्यक्षात अनेक प्रकारे चुकीचा असूनही त्याला दुर्योधनसोबत ठेवले ही त्याची नम्रता होती.

7.प्रत्येकाचे गुप्त हेतू असतात.
कर्ण आणि पांडव यांच्यातील पहिल्या सामनाच्या वेळी, दुर्योधन कर्णावर दयाळू आहे कारण कर्ण त्याच्या बाजूने असल्यास तो पांडवांना सहज पराभूत करू शकतो याची त्याला जाणीव आहे. त्यामुळेच सर्व काही घडते आणि कर्णाला दुर्योधनाच्या कर्जात आयुष्यभर टाकले जाते आणि कर्णाला दुर्योधनाच्या दयाळूपणामागील राजकारण दिसत नाही.

Download Here – Mrityunjay Book Pdf In Marathi

हे पुस्तक वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आमच्या इतर बुक्स,

Conclusion – Mrityunjay Book Review In Marathi

अस्तित्वाच्या अर्थाचा शोध हा माणसाचा शाश्वत शोध आहे आणि तोच सर्वस्वी मृत्युंजयाचा आधार आहे. हे पुस्तक एका साहित्यिक कलाकृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे ज्यामध्ये शिवाजी सावंत यांनी महाभारतातील राजपुत्राच्या व्यक्तिरेखेद्वारे जीवनाचा अर्थ शोधला आहे.

वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi 

FAQ – Mrityunjay Book Review In Marathi

1. मृत्युंजय पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– शिवाजी सावंत

2. मृत्युंजय पुस्तक का वाचले पाहिजे?

– एकूणच हे पुस्तक वाचल्यावर तुमच्या आयुष्यात विशेष बदल घडेल. तुम्ही जी कोणी स्वतंत्र व्यक्ती असाल ती नक्कीच या पैकी एका पात्राला जोडू पाहते. ते नातं जोडले गेल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडून नवा दृष्टीकोन सापडू शकतो यात शंकाच नाही.

3. मृत्युंजय पुस्तक कोणावर आधारित आहे?

– मृत्युंजय हे पुस्तक महाभारतामधील कर्ण या दानवीरवर आधारित आहे.

Thank You.

Team, 360pdfs.com

आमच्या इतर पोस्ट,

3 thoughts on “मृत्युंजय पुस्तक सारांश | Mrityunjay Book Review In Marathi”

Leave a Comment

close