(Pdf) MPSC PSI Syllabus Pdf In Marathi | PSI Syllabus 2022 In Marathi Pdf

MPSC PSI Syllabus Pdf In Marathi – नमस्कार, तुम्ही पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) नोकऱ्यांसाठी अर्ज केला आहे का? आणि MPSC गट ब परीक्षा अभ्यासक्रम शोधत आहे. तर त्या उमेदवारांसाठी आम्ही MPSC पोलिस उपनिरीक्षक आणि इतर पदासाठी लागणारा अभ्यासक्रम खाली दिलेला आहे.

MPSC PSI Prelims Exam Pattern In Marathi | MPSC PSI पूर्व परीक्षा पॅटर्न 2022

विषय व संकेतांकप्रश्न संख्याएकूण
गुण
दर्जामाध्यमपरीक्षेचा
कालावधी
प्रश्नपत्रिकेचे
स्वरूप
सामान्य क्षमता चाचणी
(संकेतांक 012)
१००१००पदवीमराठी व
इंग्रजी
एक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी
 • परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी असेल
 • लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील.
 • वेळ कालावधी आहे 60 मिनिटे म्हणजे 1 तास.
 • प्राथमिक परीक्षेत एकच विषय समाविष्ट असतो तो म्हणजे सामान्य जागरूकता.(General Awareness.)
 • यात 100 गुणांचे 100 प्रश्न असतात.

MPSC PSI Mains Exam Pattern In Marathi | MPSC PSI मुख्य परीक्षा पॅटर्न 2022

image 2
 • MPSC PSI Mains परीक्षेत दोन पेपर असतील आणि प्रत्येक पेपरसाठी 1 तासाचा वेळ दिला जातो.
 • लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतील.
 • पेपरमध्ये समाविष्ट असलेले विषय – I मराठी आणि इंग्रजी.
 • पेपर-II मध्ये सामान्य ज्ञान, योग्यता, मानसिक क्षमता या विषयांचा समावेश आहे.

MPSC PSI Syllabus Pdf In Marathi | MPSC PSI अभ्यासक्रम

येथे आम्ही परीक्षेत बसणाऱ्या सहभागींसाठी MPSC PSI अभ्यासक्रमाचा संदर्भ (MPSC PSI Syllabus Pdf In Marathi) दिला आहे. खाली दिलेला अभ्यासक्रम तुम्ही बघू शकतात. MPSC PSI अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे.

MPSC PSI Prelim Syllabus In Marathi | MPSC PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

 1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
 2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
 3. इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
 4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
 5. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
 6. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
 7. बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC PSI Mains Syllabus In Marathi | MPSC PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)

 • मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे
 • इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.

पेपर क्रमांक – 2 (सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान  – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

 1. चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
 2. बुद्धिमत्ता चाचणी
 3. महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
 4. महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
 5. भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
 6. माहिती अधिकार अधिनियम – 2005
 7. संगणक व महिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
 8. मानवी हक्क व जबाबदार्‍या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
 9. मुंबई पोलीस कायदा
 10. भारतीय दंड संहिता
 11. फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973
 12. भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)

MPSC PSI Syllabus Pdf In Marathi Download Here

MPSC पोलीस उपनिरीक्षक अभ्यासक्रम (MPSC PSI Syllabus Pdf ) डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिली आहे. उमेदवार लिंकवरून MPSC PSI अभ्यासक्रम सहजपणे डाउनलोड करू शकतात.

FAQ – MPSC PSI Syllabus In Marathi

1. MPSC मध्ये PSI साठी मुलाखत आहे का?

– एमपीएससी पीएसआय पदासाठी निवड 4 टप्प्यात विभागली गेली आहे. ते प्रिलिम, मुख्य, शारीरिक चाचणी आणि मुलाखत.

2. MPSC PSI परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता किती आहे?

– उमेदवार कोणत्याही महाराष्ट्र सरकार-मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

3. MPSC PSI परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल का?

– होय, MPSC PSI परीक्षा नकारात्मक मार्किंग योजनेचे पालन करते, ज्यामध्ये उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण मिळतो आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण गमावले जातात.

धन्यवाद.

हे देखील बघा,

Leave a Comment

close