(PDF) Maharashtra Talathi Syllabus Pdf In Marathi 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम PDF

Maharashtra Talathi Syllabus Pdf In Marathi- नमस्कार मित्रांन्नो 360pdfs.com वर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र तलाठी भारती ही महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेतील प्रसिद्ध परीक्षा आहे. महाराष्ट्र तलाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न या लेखात तुम्हाला तलाठी परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम मिळेल.

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern 2022- तलाठी (पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.

Maharashtra Talathi Exam Pattern 2022 | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा नमुना 2022

Maharashtra Talathi Exam Pattern 2022- तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200
Maharashtra Talathi Exam Pattern 2022

Maharashtra Talathi Syllabus Pdf In Marathi | महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खाली दिला आहे.

मराठी:- समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द.

इंग्रजी:- vocabulary Symons & anatomy, proverbs, tense & kinds of tense, question tag, use the proper form of the verb, spot the error, verbal comprehension passage, etc, Spelling, Sentence, structure, one-word substitution, phrases.

अंकगणित:- गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.

बुद्धिमत्ता:- अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

सामान्य ज्ञान :- महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायतराज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती.

चालू घडामोडी – सामाजिक, राजकीय, आर्थिक ,क्रीडा, मनोरंजन.

Maharashtra Talathi Syllabus Pdf In Marathi Download Here

Maharashtra Talathi Syllabus खाली PDF मध्ये दिला आहे. तर तुम्ही तो खालील बटण वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात.

FAQ- Maharashtra Talathi Syllabus Pdf In Marathi

1. तलाठीची पात्रता काय?

– कोणताही पदवीधर तलाठीची परीक्षा देऊ शकतो.

2. तलाठीचे काम काय?

– तलाठ्यांची प्रमुख कर्तव्ये अशी आहेत : (१) जमीन महसूलाची मागणी आणि वसुली यासंबंधीचे गाव खाते ठेवणे, (२) शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले अधिकार व इतर गाव फॉर्मची नोंद ठेवणे, (३) ते पिकांची आणि सीमा चिन्हांची तपासणी करा आणि कृषी आकडेवारी तयार करा.

3. तलाठ्याला इंग्रजीत काय म्हणतात?

Village Accountant.

धन्यवाद!!

Leave a Comment

close