कोसला पुस्तक सारांश । Kosla Book Review In Marathi

कोसला पुस्तक सारांश । Kosla Book Review In Marathi

kosla Book Review In Marathi – नमस्कार, आज आम्ही तुम्हाला पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित बाळचंद्र नेमाडे लिखित कोसला ह्या पुस्तकाचा मराठी सारांश Kosla Book Review In Marathi सांगणार आहोत तर तो तुम्ही नक्की वाचा.

Overview – Kosla Book Review In Marathi

भाषामराठी
लेखकबाळचंद्र नेमाडे
प्रकाशकपॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे334
किंमत299/-

Kosla Book Review In Marathi

नमस्कार, काही म्हाताऱ्या माणसाकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की हे पुस्तक वाचून काही जणांनी , तरुणांनी आत्महत्या केली आहे. पण अर्थात या गोष्टी चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या आहे. त्यामुळे तुम्ही चिंतेत राहायचं कारण नाही. तुम्ही हे पुस्तक आता बिनधास्त वाचू शकतात. तुम्ही काही आत्महत्या करणार नाही.

मित्रानो जन्मापासून तर मारणापर्यंत आपल्या सोबत कोणी तरी असतंच, अगदी सतत म्हणजे जन्मल्यावर आपल्या आजूबाजूला आई बाबांचा, नातेवाईकांचा , भावंडांचा घोळका तर असतोच. नंतर आपण जसजसे मोठे हिट जातो, शाळेत जातो, तसतसे सोबत मित्र मैत्रिणी सोबत नेतात, मग आपण अजून मोठे होतो. शाळा कॉलेज आटोपलं, मग नोकरी. म्हणजे मग घरच्या जबाबदाऱ्या म्हणजे मिठाईवर असणाऱ्या माशीसारख्या आपल्याला भिंगायला लागत. आणि मग त्या अपेक्षांचं ओझं पूर्ण नाही झालं की नकारात्मक आपल्याला साथ देऊ लागते. या जगात माणसांच्या आयुष्यात दगा न देता शाश्वत साथ देणारी गोष्ट असेल तर ती आहे नकारात्मकता.

नकारात्मकता माणसाला जगायला शिकवते आणि त्याच सोबत नकारात्मकता माणसाला मरायला सुद्धा शिकवते. आता या जगायला उम्मीद देणारी गोष्ट मरायला प्रवृत्त कशी करू शकते. असा आपल्याला प्रश्न पडला असेल.

त्या नकारात्मकतामाणसाने का जगू नये हे दाखवती. पण याचा दुसरा अर्थ नकारात्मकता माणसाला कशा प्रकारे जगू नये हे दाखवते. म्हणजेच उलट अर्थी कसं जगावं हे शिकवते.

नकारात्मकता मधून शिकायचे असेल तर स्वतः निराशेच्या घरट्यात सापडा. किंवा स्वतः ना सापडता दुसऱ्याच्या निराशेतून अनुभव घेयचा असेल तर पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित बाळचंद्र नेमाडे लिखित कोसला हे पुस्तक वाचा.

हि कथा पांडुरंग सांगवीकर या एका तरुना भोवती फिरते. पांडुरंग सांगवीकर नावाचा एक पंचवीस वर्षीय तरुण , घरची परिस्थती बरी असलेला , वडीलाविषयी चीड असलेला पुढे गाव सोडून पुणे शहरात येतो. पुण्यात आल्यावर तो एका हॉस्टेल मध्ये राहतो. आणि हॉस्टेल म्हंटलं तर किस्से आलेच. पुढे स्व कर्तृत्वाने जनरल सेक्रेटरी होतो.

कॉलेज चा काम सांभाळताना वेगवेगळे आरोप होतात. खचतो लढतो तरीही खचतो आणि मग नंतर नैराश्य येऊन गावात जाऊन रिकामटेकडे पनाचा वर्तुळ पूर्ण करतो. वरवर पाहता हि कथा साधी वाटली तरी ती तितकी साधी नाही. या कथेत वादळ आहे. या वादळा पूर्वी शांतता सुद्धा आहे आणि त्यानंतरचा उद्रेक सुद्धा आहे. हि कथा आपल्यात रुजत जाते.

निर्माण केले गेलेले अनेक प्रसंग आपल्या आयुष्यातील प्रसंग आहे असे काही दाखवू शकतात. पुस्तकाची भाषा ही बोलकी आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा येथे सखोल अभ्यास होऊ शकतो. सांगवी कारांचं आयुष्य पाहता ती गरजेची सुद्धा आहे. मध्ये काही डायरी फॉर्म्यट सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे पुस्तकाला वेग येतो.

पुस्तकाचं मुखपृष्ठ नितीन दादरावाला यांनी केले असून ते पुस्तकाच योग्य वळण पकडते. एक खुर्ची त्यावर विस्कळीत पडलेली साडी बाहेरील खिडकीची चौकट त्यातून दिसणारा वृक्ष टेबलावरील हॉस्टेल आयुष्याच्या खुणा गडद काळ्या सावळ्या रंगाचा वापर करत जणू लेखकाचं आयुष्यच मुखपृष्ठावर साकारलेलं आहे .

मुद्दा एवढाच आहे लेखकाच्या लेखणीची ताकद काय काय करायला लावू शकते याचा अंदाज येतो. लेखक भालचंद्र नेमाडे यांचं हे यश आहे.

वाचा – Chava Book Review In Marathi

About Writer

नेमाडे यांचा जन्म 1938 साली महाराष्ट्रातील सांगवी येथे झाला. मग ते पुण्यात शिक्षणाला होते. कोसला हि त्यांची विशेष लोकप्रिय कादंबरी. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसेच साहित्यिक क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा मनाचा ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. तसच पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. इतका साधा लेखक जगाच्या पाठीवर क्वचितच आढळेल. कारण या लेखकाने आपण जगात असलेली परिस्थिती आपल्या आजूबाजूच्या घटनांमधून नेमकी दुखणी शोधून काढून त्यावर प्रहार करण्याचं कसब या हाताळल्या आहे. म्हणून लेखकाने लिहिलेलं वाचून आपण खंगळून जायला होतं.

आपण अंतर्मुख होतो. विचार करायला लागतो. कसं वागावं त्या सोबत कस वागू नये याचेही धडे मिळतात. त्याचसोबत हि कादंबरी म्हणजे 1960 च्या दशक दरम्यान ग्रामीण महाराष्ट्र समजून घेण्याचा वस्तुनिष्ठ वस्तुपाठ आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राची उकल यातून करता येते. त्यामुळे ही कादंबरी साहित्यिक न राहता एक सामाजिक आणि सांस्कृतिक सुद्धा होते.
म्हणूनच अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा हि कादंबरी परिपूर्ण आहे.

वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi

Conclusion – Kosla Book Review In Marathi

एकूणच हे पुस्तक म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यातील निदान एकातरी घटना प्रसंगाचा जिवंत साक्षीदार आहे. नाकारात्मकतेच्या उत्तरांचे मूळ हे सकारात्मक प्रश्न असतात आणि हे जर शोधून काढायचे असतील तर आपण हि कादंबरी वाचायलाच हवी.

FAQ – Kosla Book Review In Marathi

1. कोसला या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– बाळचंद्र नेमाडे.

2. कोसला हे पुस्तक का वाचले पाहिजे

– नकारात्मकता मधून शिकायचे असेल तर स्वतः निराशेच्या घरट्यात सापडा. किंवा स्वतः ना सापडता दुसऱ्याच्या निराशेतून अनुभव घेयचा असेल तर पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित बाळचंद्र नेमाडे लिखित कोसला हे पुस्तक वाचा.

आमच्या इतर पोस्ट,

धन्यवाद!!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read