एक होता कार्व्हर पुस्तक सारांश | Ek Hota Carver Book Review In Marathi

एक होता कार्व्हर पुस्तक सारांश | Ek Hota Carver Book Review In Marathi

Ek Hota Carver Book Review In Marathi – नमस्कार, शास्त्रण्य म्हंटलं तर तुमच्या डोळ्यासमोर नेमक काय येत? प्रयोग करणारा, समोर अनेक रसायनं असणारा , विविध यंत्र समोर असले आणि त्याच्या साहाय्याने सतत काहीतरी करणारा. कार्यमग्न आणि मुख्यतः अबोल म्हणजे कोणाशी न बोलणारा, कोणातही न मिसळणारा. स्वतः आपल्या विचारांशी, सिद्धांतांशी झगडत प्रयोग यशस्वी झाल्यावर मगच जगासमोर येणारा. अशी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर तयार झालेली असते ती शास्त्रण्याची. पण कधी शास्त्रण्याचं नाव घेतल्यावर तुमच्यासमोर शेतकरी उभा राहिलाय? शेतामध्ये काम करणारा, शेतीवर विविध प्रयोग करणारा, ते नंतर लोकांना समजावून सांगणारा असं कधी आला आहे का तुमच्या डोळ्यासमोर? चला तर या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Ek Hota Carver Book Review In Marathi सांगणार आहोत आणि त्यामध्येच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देखील भेटेल.

Overview: एक होता कार्व्हर | Ek Hota Carver Book

भाषामराठी
प्रकाशकराजहंस प्रकाशन
पृष्ठे184
एक होता कार्व्हर पुस्तकाची किंमतAmazon (192 Rs)
Flipkart (250 Rs)

एक होता कार्व्हर पुस्तकाबद्दल माहिती | Information About Ek Hota Carver Book

(Ek Hota Carver Book Review In Marathi) हे पुस्तक प्रचंड इंटरेस्टिंग . पण त्या ही पेक्षा ते कणभर जास्त मोटिवेशनल सुद्धा आहे. आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होता होता कसं नेमक जगावं याच हे उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचल्यावर निसर्गाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन निश्चित पने बदलू शकतो. या पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या विश्वात एक विशेष स्थान मिळवले आहे. या पुस्तकाची 45वि आवृत्ती गेल्या वर्षी प्रकाशित झाली. पुस्तक हातात घेतल्या घेतल्या त्याची प्रचिती आपल्या लक्षात येते. एखादा वाचक जेव्हा पुस्तकाच्या दुकानात जातो तेव्हा तो पुस्तक उघडून बघतो. ते पुस्तक त्या मोजक्या सेकंदामध्ये नेमकं काय डिलिव्हर करतं त्यावर त्या पुस्तकाचं विकत घेणे आणि त्याच्या बद्दलच यश अपयश अवलंबून असते. हे पुस्तक त्याच्या पैकी च्या पैकी मार्क्स मिळवते.

पुस्तकाचं मुखपृष्ठ सतीश देशपांडे यांनी तयार केलेले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कार्व्हर यांचा प्रयोग करताना मग्न असल्याचा एक फोटो आहे. आणि त्या खाली माणूस आणि निसर्ग यांची सांगड घालून माणूस हा निसर्गा मध्येच कसा वसलेला आहे याच प्रत्यय देणारं रेखाटन आहे. जे कार्व्हर यांच्या जीवनाचा सार आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर वाचकांनी हे पुस्तक का वाचावं याच नेमकं कारण दिले आहे.

पुस्तक अगदी सुटसुटीत आहे अगदी सोपी भाषा त्यात दिलेली आहे. आणि हे लेखिकेचे यश म्हणावं लागेल. लेखिका विना गवाणकर यांनी एक होता कार्व्हर पुस्तक सुरेख शब्दात हे लिहिलेलं आहे. पुस्तकामध्ये चित्रे असल्याने ते वाचण्यात अजून आपल्याला आवड निर्माण होते. पुस्तकाच्या शेवटी कार्व्हर यांची पूर्ण जीवनयात्रा दिली आहे.

आपण सध्या जे आयुष्य जगतोय त्यात सहजकता आणायची असेल आणि आयुष्यातील निसर्गाचं महत्व आणि निसर्गात असलेल्या गोष्टींचा वापर खऱ्या आयुष्यात कसा करायचा हे जाणून घेयच असेल तर हे पुस्तक (Ek Hota Carver Book Review In Marathi) वाचायलाच हवं.

एक होता कार्व्हर पुस्तक सारांश | Ek Hota Carver Book Review In Marathi

Ek Hota Carver Book Review In Marathi – प्रयोगशील शेतकरी हा एक प्रकारे शास्त्रण्यच. फक्त तो लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्यात गरजेचं असतं. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा मुखपयोगी प्रयोग करून थेट अंमलात आणण आवश्यक असतं. आता तुम्ही म्हणाल असं कुठे असतं. असे आम्हाला कोणी दिसतच नाही. आहेत असे अनेक आहे. किंबहुना असे शास्त्रन्य पूर्वी पासून होते. आणि त्यांच्यातीलच एक होता कार्व्हर.

कार्व्हर यांची जीवनकथा | Biography of Carver

अमेरिकेमधील मिझोरी राज्यातील डायमंड गो पाड्यावर कार्व्हर नावाचा जर्मन शेतकरी होता. तिथे मेरी नावाची निग्रो गुलाम होती. तो कार्व्हर इच्छा नसून सुद्धा तिला आपल्या पत्नीला मदत म्हणून सातशे डॉलर्स ला विकत घेतले होते. एके दिवशी एक चोरांची टोळी येऊन मेरी आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाला पळवून घेऊन जातात. कार्व्हर त्यांना सोडवण्याचे खूप प्रयत्न करतात पण एवढ्या प्रयत्नाने ते फक्त त्या दोन वर्षांच्या मुलाला सोडवू शकतात, मेरी ला नाही . पुढे ते त्या मुलाचा सांभाळ करतात. त्याला वाढवतात आणि त्याच जॉर्ज कार्व्हर असं नामकरण करतात.

पुढे तो मुलगा अतिशय कष्टात दिवस काढतो. त्याला धड बोलता हि येत नसतं. सगळ्यांना तो मुका आहे असं वाटत. पण त्याच्यात एक विशेष चमक असते. निसर्गाचं त्याला प्रचंड आकर्षण असतं. वेगवेगळी पान फुले गोळा करणे, मातीच निरीक्षण, परीक्षण करन हे त्याचं आवडीचं काम. दुसऱ्यांच्या शेतात काम करून पैसे गोळा करून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तो चित्रकलेत सुद्धा हुशार होता. त्याने काढलेली चित्र आज सुद्धा एक उत्तम नमुना म्हणून पहिली जातात. समोर आलेल्या अनेक संकटावर मात करून त्याने आपल शिक्षण पूर्ण केलं. आणि अखेर त्याच कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला.

वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi 

कार्व्हर यांच्या जीवनातील महत्वाचा भाग | Important part of Carver life

1865 च्या डिसेंबर महिन्यात निगृ च्या स्वातंत्र्यासाठी मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र अडीचशे वर्ष गुलामगिरीत जगलेल्या चाळीस लाख लोकांना एका एकी स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता येणार कुठून? त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देण्याच गरजेचं नाही तर धंदे शिक्षण हि देण्याच गरजेच आहे आणि याच विचारांतून अनेक संस्था चालू झाल्या. आणि त्यातकीच एक अल्बमा येथील टेस्केगीस संस्था. तेथे ते शेतीविषयक विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले.

कार्व्हर यांनी केलेले महत्वाचे प्रयोग | Important experiments by Carver

जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्या परिसराची अवस्था प्रचंड वाईट होती. आणि तेच त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं. आणि तिथे असणाऱ्या विदयार्थ्यांना हाताशी घेऊन तिथे प्रयोग करून एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली. दिवस रात्र मेहेनत घेऊन तिथे विविध प्रयोग केले. अनेक वर्षे जिथे कापसाचे पीक घेतले जात होते तिथे भुईमूग लावून उगवून त्यांनी जमिनीची अवस्था कशी सुधारेल त्याच ज्ञान दिलं. त्याच भुईमुगापासून तीनशे पदार्थ बनवून दाखवले. जिथे फक्त कापसाची लागवड होत होती तिथे आता अनेक पिकांचे प्रयोग होऊ लागले. असे अनेक प्रयोग त्यांनी केले. आणि मुख्यतः ते प्रयोग रोजच्या व्यवहारात आणले. सामान्यांना सामान्य आयुष्यात वापरता येतील असे प्रयोग त्यांनी करून दाखवले. आणि विशेषतः त्यांनी त्यावर कधी पेटंट हि घेतलं नाही.

सगळं लोकांसाठी कायम मोफत. लोंकासाठी नेहमी धावून जाणारे, लोकांना कायम विनामूल्य सल्ला देणारे अशी त्यांची सगळीकडे ओळख झाली. मोठमोठ्या विद्यापीठातून सल्ले घ्यायला मंडळी येत. त्यांनी अर्थजनापेक्षा ज्ञानार्जनाला जास्त महत्व दिले. आणि आपल्या विद्यार्थ्यांना तशीच सवय लावली. 1896 ते 1943 या काळात त्यांनी फक्त सव्वाशे डॉलर एवढंच पगार त्यांनी घेतला.
कॉलेज जीवनात मित्रांनी घेऊन दिलेला जो सूट होता तोच त्यांनी आयुष्यभर वापरला. असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसं जगता येत याचा तो आदर्श परिपाठ आहे.

वाचा – Think And Grow Rich Review in Marathi

FAQ – Ek Hota Carver Book Review In Marathi

1. एक होता कार्व्हर ह्या पुस्तकाच्या लेखिका कोण आहे?

– विना गवाणकर ह्या एक होता कार्व्हर ह्या पुस्तकाच्या लेखिका आहे.

2. एक होता कार्व्हर हे पुस्तक का वाचले पाहिजे?

– आपण सध्या जे आयुष्य जगतोय त्यात सहजकता आणायची असेल आणि आयुष्यातील निसर्गाचं महत्व आणि निसर्गात असलेल्या गोष्टींचा वापर खऱ्या आयुष्यात कसा करायचा हे जाणून घेयच असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

3. एक होता कार्व्हर ह्या पुस्तकाची किंमत किती आहे.

– एक होता कार्व्हर ह्या पुस्तकाची किंमत Rs.192/-

Thank You.

Team, 360pdfs.com

आमच्या इतर पोस्ट,

Admin

2 thoughts on “एक होता कार्व्हर पुस्तक सारांश | Ek Hota Carver Book Review In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read