(Free) छावा कादंबरी पुस्तक PDF डाउनलोड | Chava Shivaji Sawant Book PDF In Marathi Free Download

Chava Marathi Pdf– नमस्कार मित्रानो, तुमचे स्वागत आहे 360pdfs.com ब्लॉगवर. आज आम्ही तुम्हाला छावा कादंबरी उपलब्ध करून देत आहोत ते सुद्धा मोफत. शिवाजी सावंत यांचे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे, खूप नावाजलेले छावा पुस्तक Chava Book आपण मोफत येथे वाचू शकता.

Chava Marathi Book PDF Overview

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
PublisherMehta Publishing House
Pages438
Summery(chhava by shivaji sawant) छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.
Chava Marathi Book PriceFREE ( You can Download PDF File )
Chava Pdf

Chava Marathi Book PDF Summary

Chava Marathi Book PDFछत्रपती यांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर या ठिकाणी झाला . त्यांचा जीवनकाल बघायला गेलं तर खूप कठीण. बिकट परिस्थितींत ते पहिल्यापासूनच अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितींशी महाराजांनी सामना केला आणि हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचा प्रेरणास्थान बनला. राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांत जिजाबाइंचे निधन झाले. संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे दुसरे कोणी राहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतलेले असत.सळसळत्या रक्त असलेले असे संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनेक अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीमहाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले होते हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले होते.अण्णाजी दत्तों हे महाराजांचे एक अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक होते पण तेवढेच ते लबाड , भ्रष्टाचारी देखील होते. त्यांच्या झालेल्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. नंतर शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत शंभू राजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे राजेंना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून शंभू राजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि डोक्यावर असलेला मायेचा प्रेमाचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईनी जे कटकारस्थान केले ते वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर शंभू राजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण एक होते ते म्हणजे सरनोबत हंबीरराव मोहिते. सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य परिस्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. संभाजीराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी झाला. या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी जी साथ दिलीत्याचे सुंदर वर्णन Chava kadambari या पुस्तकात केले आहे.

पुढे सगळं शंभूराजांचा खडतर इतिहास सांगितला आहे. तो वाचून तुमच्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. Chava kadambari in Marathi खाली दिलेली आहे.

Download Here – Chava Kadambari Marathi Pdf Download Here

Video – छावा कादंबरी पुस्तक

https://youtu.be/ctjvLNDLfu0

FAQ – छावा कादंबरी पुस्तक PDF डाउनलोड | Chava Shivaji Sawant Book PDF In Marathi

छावा पुस्तकाची किंमत किती आहे?

छावा पुस्तकाची किंमत ३२० रुपये आहे?

छावा कादंबरी पुस्तकातून काय शिकायला मिळाले?

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.

छावा पुस्तकाचे लेखक कोण आहे?

शिवाजी सावंत.

धन्यवाद.

close