इंग्रजी शिकण्यासाठी बेस्ट पुस्तके । Best Books to Learn English Through Marathi

Best Books to Learn English Through Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या युगात इंग्रजी शिकणे आणि बोलणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहेच, जेव्हा तुम्ही खाजगी किंवा सरकारी खात्यात नोकरीसाठी अर्ज करता आणि जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते, त्या वेळी इंग्रजीत मुलाखत द्यावी लागते.परंतु जर तुम्हाला इंग्रजी कसे बोलावे ते माहित नसेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी समस्या बनते, तुमच्या समस्येवर उपाय आम्ही आणला आहे. तो उपाय खाली दिलेला आहे.
Best Books to Learn English Through Marathi
इंग्रजी शिकण्यासाठी बेस्ट पुस्तके खालीलप्रमाणे –
- Instant English
- इंग्रजी मध्ये बोला पटकन
- Navneet Speak well English
- Rapidex English Speaking Course
Instant English
भाषा | मराठी |
पब्लिकेशन | सालाम चाऊस |
पृष्ठे | 608 |
किंमत | 150/- |
अब्दुल सलाम चाऊस यांचे पुस्तके खूप चांगले असतात. तर हे पुस्तक तुमच्यासमोर आणण्याचा आज कारण असे आहे की खूप भारी, पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस वर आधारित असणारे एकमेव पुस्तक आहे. ते सुद्धा कमी किंमती मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे. खूप चांगला असा सर्व या पुस्तकामुळे होतो. ते अशा प्रकारे कि तुम्ही जर पुस्तकाचे कोणते पण पान काढले कि एक मराठी वाक्य त्याखाली त्याचे अत्यंत सुंदररित्या इंग्रजी मध्ये भाषांतर दिले आहे. तुम्ही जर ह्या पुस्तकांमधून रोज सराव केला तर हेय तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे.
इंग्रजी मध्ये बोला पटकन
भाषा | मराठी |
पब्लिकेशन | सालाम चाऊस |
पृष्ठे | 480 |
किंमत | 120/- |
हे पुस्तक खूप सुंदररित्या तयार केली आहे. तुम्ही नक्कीच यामधून लवकरात लवकर इंग्रजी शिकू शकतात. वाक्य कसे तयार करायचे ( sentenc formation) त्यानंतर व्याकरण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये दिलेले आहे. ते खूपच तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
तुम्ही जर tenses जर नाही शिकले तर तुम्ही sentence formation करू शकत नाही परंतु ह्या पुस्तकामध्ये tenses अतिशय सोप्या पद्धतीने आणि सरळ सोप्या भाषेमध्ये दिले आहे. हे पुस्तक तुम्ही जवळच्या बूक डेपो मधून किंवा ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकतात. दोन्ही ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे
Navneet Speak well English
भाषा | मराठी |
पब्लिकेशन | नवनित |
पृष्ठे | 422 |
किंमत | 298/- |
ह्या पुस्तकाची गंमत अशी आहे की हे पुस्तक जेव्हा तुम्ही खरेदी करतात तर तुम्हाला त्या बरोबर एक सीडी देखील भेटते. हि सीडी तुम्ही कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये टाकून ऐकू शकतात आणि त्यातून सुद्धा इंग्रजी शिकू शकतात. यामध्ये इंग्रजी मुळाक्षरे , संभाषण कला कौशल्य , त्यानंतर शिक्षक विद्यार्थी संभाषण, आई मुलगी यांतील संभाषण किंवा दोन मित्रांमधील संभाषण इत्यादी. असे प्रत्येक संभाषण अत्यंत सोप्या भाषेत येथे मांडले आहे. त्याच बरोबर तुम्हाला सामान्य ज्ञान सुद्धा दिले आहे. शेवटी तुम्हाला exercise दिले आहे ते तुम्ही सोडवून त्याचा सर्व5 देखील करू शकतात.
Rapidex English Speaking Course
भाषा | मराठी |
पब्लिकेशन | युनिकॉर्न बुक्स |
पृष्ठे | 440 |
किंमत | 225/- |
हे पुस्तक वाचण्याची खालील कारणे आहेत-
सुरुवातीला रॅपिडेक्स ३० दिवसांचा कोर्स उपलब्ध होता पण हे पुस्तक ४५ दिवसांचे आहे. ज्या अंतर्गत तुम्हाला इतर अनेक विषयांवर तपशीलवार माहिती मिळते.
इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी आणि ही प्रक्रिया केव्हा आणि कशी बदलावी हे या पुस्तकातून समजू शकते.
तुमच्यासाठी बोलण्यासाठी शब्द असणे खूप महत्वाचे आहे, त्यामुळे या पुस्तकात तुम्हाला एक डिक्शनरी देखील मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला दैनंदिन वापराचे आणि उपयुक्त शब्द देण्यात आले आहेत ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप उपयोग होईल.
वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगितला आहे, ज्यामुळे तुम्हाला इंग्रजीमध्ये बोललेल्या वाक्याची चांगली ओळख होते.
क्रियापद – इंग्रजी बोलण्यात क्रियापद ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याचे अनेक रूपे आहेत आणि कोणता फॉर्म कधी वापरावा, इत्यादी सर्व माहिती या पुस्तकात तुम्हाला मिळेल.
सरावावर लक्ष केंद्रित करा- या पुस्तकात सरावावर विशेष लक्ष देण्यात आले आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला दिवसानुसार गोष्टी सांगण्यात आल्या आहेत आणि सराव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पॅसेज- इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याकडे फक्त 1 किंवा 2 वाक्ये नसावीत, तर आपण सतत इंग्रजी बोलू शकतो यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्यासाठी या पुस्तकात महत्त्वाचे उतारे देखील दिले आहेत.
निष्कर्ष –
आशा करतो तुम्हाला हे इंग्रजी पुस्तके आवडली असतील, एकदा वाचून नक्की तुमचा फीडबॅक कळवा.
जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर, खालील दिलेल्या मराठी पुस्तकांचा सारांश नक्की चेक करा
आमच्या इतर पोस्ट,
- Time Management Book Review in Marathi
- Cashflow Quardant Book Review in Marathi
- Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
- Ikigai Book Review in Marathi
- Why A Students Work For C Students Review in Marathi
- Chanakya Niti Book Review in Marathi
- Think And Grow Rich Review in Marathi
- The Secret of Millionaire Mind Review in Marathi
- The Magic Book Review in Marathi
- Believe in Yourself Book Review in Marathi
धन्यवाद!!