बटाट्याची चाळ पुस्तक सारांश | Batatyachi Chal Book Review In Marathi

बटाट्याची चाळ पुस्तक सारांश | Batatyachi Chal Book Review In Marathi

Batatyachi Chal Book Review In Marathi

मुंबई हि एक देशाची आर्थिक राजधानी तुम्हाला तर माहितीच असेल. आज उंचच उंचइमारती मध्ये हरवलेली हि मुंबई पूर्वी कशी होती हे माहित आहे का ? जर या मुंबईला टाईम मशीन लावता आले असते तर तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकले असते की मुंबई ही बटाट्याच्या चाळीसारखीच होती.
तर मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बटाट्याची चाळ ह्या पुस्तकाचे परीक्षण.

Overview – Batatyachi Chal Book

लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
पब्लिशरमौज प्रकाशन गृह
किंमत195/-

Batatyachi Chal Book Review In Marathi

बटाट्याची चाळ हे पुस्तक जेव्हा तुम्ही हाती घ्याल तेव्हा त्याचे मुखपृष्ठ हे आपले लक्ष वेधून घेते. कारण डेरेदार वृक्ष आणि त्यांचा बांध्यामध्ये वसलेली बटाट्याची चाळ यामुळे. जर तुम्ही वरवर बघितले तर ती तुम्हाला प्रचंड गजबजलेली दिसते. त्यातली नाती एखाद्या वृक्षाइतकी भक्कम, त्यातही काहीशी गंमतच होती. पुस्तक मध्ये दिलेले सर्व चित्रे व मुखपृष्ठ हे वसंत सरवटे यांनी रेखाटलेले आहे.

बटाटयाची चाळ या पुस्तका मध्ये मोठी प्रस्तावना वैगेरे दिली नाहीये. पुलंनी फक्त 4 ओळींमध्ये तीन वाक्ये प्रस्तावने मध्ये लिहिलेली आहेत. यातून लेखकाचा साधेपणा हा नक्कीच स्पष्ट होतो.

या पुस्तकामध्ये एकूण 12 प्रकरणे दिली आहेत. प्रकरणे म्हणायला ती इतकी क्लिष्ठ नाहीये परंतु त्यांना आपण धडे म्हणालो तर लेखकांना नक्कीच आवडणार नाही असे वाटते. यामधील काही प्रकरणाचा आपण छोटासा आढावा घेऊ.

या पुस्तकामध्ये दिलेली पहिली दोन प्रकरणे हि सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शिष्ठमंडळ ही आहेत. या प्रकरणामध्ये लेखकांनी व्यक्तिरेखा साकारण्याचा छान असा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा ही विरुद्ध अंगाने रंगवताना त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा प्रयत्न या मध्ये आपल्याला दिसून येतो. या दोन्ही प्रकरणामध्ये लेखक ती चाळ, चाळीतील व्यक्ती आणि त्या व्यक्तींबाबतीत घडणारे काही किस्से यांचे वर्णन केले आहे.

गच्चीसह- झालीच पाहिजे हे ह्या पुस्तकातील अजून एक छान प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये चाळीचा मालक हा नवीन झाल्याने तो लोकांना काही नवीन सुविधा देण्याचे जाहीर करतो. तो चालीची गच्ची सर्वांसाठी खुली करून देतो. मग नंतर ती गच्ची आपली स्वतःची व्हावी यासाठी सर्व प्रयत्न करतात. पुढे होणारी धमाल या प्रकरणात लेखकाने पुढे मांडलेली आहे.

उपवास हे प्रकरण तर फारच मजेशीर तुम्हाला वाटेल. यामध्ये पंतांचे वजन वाढल्याने ते डायट करण्याचे ठरवतात. त्या डायटचा कसा बोजवारा उडतो हे आजच्या काळातील साधर्म्य असणारी घटना त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या पुस्तकामध्ये रघुनानांची कन्येस पत्रे, काही वासऱ्या ही प्रकरणे सुद्धा उत्तमच आहेत. भ्रमण मंडळ हे प्रकरण म्हणजे या सगळ्यांचा कळसच आहे. काही जण हे ट्रिप प्लॅन करतात, मग त्या ट्रिपचे काय घडते, ती कशी होते आणि त्यातल्या गमतीजमती ह्या सुद्धा मजेशीर आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे.

वाचा – Chava Book Review In Marathi

About Writer P. L. Deshpande In Marathi

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, ज्यांना त्यांच्या पु ल या नावाने प्रेमाने ओळखले जाते. त्यांना “महाराष्ट्राचे सर्वात प्रिय व्यक्तिमत्व” म्हटले गेले आहे. लेखक, नाटककार, वक्ता, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, हार्मोनियम वादक, गायक, सांस्कृतिक नेते आणि परोपकारी अशा अनेक भूमिकांमध्ये ते आदरणीय बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई, भारतातील एका चाळीत जन्मलेल्या पु ल यांनी आपली सुरुवातीची वर्षे मुंबईच्या उपनगरात घालवली, पार्ले, जे त्या वेळी सांस्कृतिक क्रियाकलापांचे एक भरभराटीचे केंद्र होते.

बाल गंधर्व, राम गणेश गडकरी, रवींद्रनाथ टागोर आणि चार्ली चॅप्लिन हे कला, साहित्य आणि संगीत या क्षेत्रातील पु ल यांचे सुरुवातीचे प्रभाव आणि मूर्ती होते.

वाचा – Man Mai Hai Vishwas Book Review In Marathi

Conclusion – Batatyachi Chal Book Review In Marathi

बटाट्याची चाळ हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील एक उत्कृष्ठ नमुना आहे. ह्या पुस्तकात पु लं बरंच काही आपल्याला सांगून जातात. त्यांच्यातील सारकॅसम हि खूप काही बोलून जातो. तो आपल्याला हसायला सुद्धा लावतो परंतु नकळत घशात अचानक अवंढा येईल अशी तरतूद देखील करतो.

FAQ – Batatyachi Chal Book Review In Marathi

1. बटाट्याची चाळ ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– पु. ल. देशपांडे

2. बटाट्याची चाळ ह्या पुस्तकाची किंमत.

– Rs.195/-

आमच्या इतर पोस्ट,

धन्यवाद!!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

close
भगवान श्रीकृष्णने कर्णाचे अंतिम संस्कार का केले Work From Home Jobs For Ladies In Marathi ७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read