(Free Pdf) अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Book Pdf In Marathi Download

(Free Pdf) अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Book Pdf In Marathi Download

Amrutvel Book Pdf In Marathi वि.स.खांडेकर हे ‘जीवनवादी’ लेखक म्हणून ओळखले जातात.या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,”माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं. प्रीती म्हणजे उदात्त करूणा आणि आपुलकीच्या शिंपणानं बहरलेली अमृतवेल.’… या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची पाउलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलवते. (Amrutvel in Marathi) मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा– प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी पाऊलांचे झुबके लटकू लागतात…’

Overview – Amrutvel Book Pdf In Marathi

Authorवि.स. खांडेकर
LanguageMarathi
No Of Pages152
Weight163 gm
Categoryकादंबरी
publicationमेहता पब्लिशिंग हाऊस

Download Here – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Book Pdf In Marathi

आमच्या इतर बुक्स,

SummaryAmrutvel Book Pdf In Marathi

Amrutvel in Marathi- या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. सार्‍या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा – जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा — प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र – रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात.

Amrutvel Book In Marathi ( थोडक्यात सारांश )

अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई,.नंदा मावशी, नंदा मावशी” म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व!

एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.

दुसऱ्या दिवशी नंदा आणि दादा दासबाबू यांच्याकडे नंदाच्या पी.एच.डीच्या प्रबंधाबद्दल चर्चा करावयास जातात.त्यांच्या चर्चेचं संभाषण खांडेकरांनी एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे विणले आहे.दासबाबू नंदाला ५-६ महिने घराबाहेर फिरून जग पाहण्याचा सल्ला देतात. विलासपूरची जहागिरदारीण वसुंधरेला एका कंपॅनियनची गरज हवी आहे, असं दासबाबू नंदाला सांगतात. वसुंधरा दुसरी कोणी नसून आपली जुनी मैत्रीण आहे, हे कळताच नंदा लगोलग विलासपुरास जावयास तयार होते. Amrutvel in Marathi संपूर्ण कादंबरी वाचण्यासाठी आम्ही वर दिलेल्या लिंक मधून तुम्ही कादंबरी डाउनलोड करु शकतात धन्यवाद.

FAQ – अमृतवेल कादंबरी PDF | Amrutvel Marathi Book PDF Free Download Here

अमृतवेल कादंबरी लेखक कोण ?

अमृतवेल कादंबरी लेखक वि. स. खांडेकर आहे.

अमृतवेल कादंबरीची किंमत किती आहे?

अमृतवेल कादंबरीची किंमत १२० ते १५० रुपये इतकी आहे.

धन्यवाद.

हे देखील वाचा,

Admin

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read