Agnipankh Book Review In Marathi – अग्निपंख हे पुस्तक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर आधारित श्री अरुण तिवारी यांच्या “विंग्ज ऑफ फायर” या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. माधुरी शानभाग यांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे. डॉ. कलाम यांनी त्यांचा जीवनप्रवास कथन करून वाचकाला स्वतःची आंतरिक आग आणि क्षमता ओळखण्यास उद्युक्त केले, कारण त्यांचा असा ठाम विश्वास होता की आपल्यापैकी प्रत्येकजण जगात मूर्त बदल घडवून आणण्याची ताकद आणि क्षमता घेऊन जन्माला आला आहे. स्वप्ने साध्य करण्यासाठी त्याने स्वतःला कशी प्रेरणा दिली आणि ते कसे पूर्ण करत गेले हे ह्या पुस्तकामध्ये छान टिपले आहे.
Overview – अग्निपंख पुस्तक | Agnipankh Book In Marathi
भाषा | मराठी |
लेखक | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम |
प्रकाशक | राजहंस प्रकाशन |
पृष्ठे | 179 |
किंमत | 174/- |
अग्निपंख पुस्तक सारांश | Agnipankh Book Review In Marathi
Agnipankh Book Review In Marathi – एक असं व्यक्यिमत्व त्याने प्रत्येक भारतीय मनाला आकाशाच्या पलीकडचे स्वप्न दाखवलं. आणि जगायला हि शिकवलं. एक असा माणूस ज्याने प्रत्येक भारतीय तरुणाला प्रयत्नशील बनवले. आणि अशी एक असामी ज्याने भारताला अवकाश भरारी घ्यायला लावून संपूर्ण जगाला अवाक केलं असे डॉ. ए. पि. जे अब्दुल कलाम. यांच्या गरुड क्षेपेवर आधारित अग्निपंख या आत्मचरित्राचा आपण परीक्षण (Agnipankh Book Review In Marathi)करणार आहोत.
राजहंस प्रकाशन प्रकाशित, अग्निपंख हे पुस्तक म्हणजे डॉ. कलाम यांचे फक्त आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानाच्या लढाईच एक स्पंदन आहे. डॉ. कलाम यांना आव्हान होता तो आपल्या देशाचा. आपण ज्या देशात जन्मलोय त्याला जगात सर्वोच स्थान कसे मिळेल याचीच त्यांना आस होती. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे जागतिक शस्त्र स्पर्धेची त्याच्या राजकारणाची आणि विज्ञानाची लढाई आहे. तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत देशाने नेतृत्व करावं हा त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग आहे.
हे पुस्तक स्वतः कलाम यांनी लिहिलेले आहे. त्यांना लेखन साहाय्य अरुण तिवारी यांनी केलं असून त्याचा मराठी अनुवाद माधुरी शानबाग यांनी केला आहे. याचा मराठी अनुवाद अगदी सहज सोपा झाला असून सामान्य वाचकाला उमजेल अशी ती भाषा आहे. सामान्य वाचक कोठेही अडखळणार नाही आणि जीवन प्रवाहाचा प्रवास कोठेही खंडित होणार नाही याची ग्वाही या पुस्तकाची भाषा देते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश देशपांडे यांनी साकारले असून विचारमग्न कलाम त्यांनी अचूक साकारलेलं आहे. डॉ. कलाम यांनी हे पुस्तक मातापित्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केलंय. असे करताना त्यांनी त्यांच्यावर कविता सुद्धा केली आहे. हे पुस्तक पाच विभागामध्ये विभागलेलं आहे.
हे पुस्तक म्हणजे डॉ. कलाम यांच्या जीवन प्रसंगाच घटना वर्णन असून त्याच सोबत भारत देश स्वयंपूर्ण होण्यासाठी केलेल्या कष्टाचं मनोहरिक खंड काव्य सुद्धा आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती | Information about Dr. A.P.J. Abdul Kalam In Marathi
तामिळनाडू मधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्रात एका अशिक्षित नावळ्याच्या पोटी 1931 मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.
इतिहास उलगडणाऱ्या मालिकेत कलाम यांना समाविष्ट करून घेण्याची तीन प्रमुख कारणे आहे.
एक म्हणजे, सध्या स्थितीतील भारतात इतिहास पुरुष म्हणून वंदनीय वाटेल असा विद्वान एकमेव माणूस होऊन गेला. दुसर म्हणजे, अवकाश क्षेत्रात त्यांनी इतिहास रचून भारताला अनेक मानसन्मान मिळवून दिले. आणि तिसरे कारण म्हणजे, आपली मालिका हि स्वराज्यापासून सुरु होऊन सुराज्यजवळ येऊन संपतेय. त्यातील स्वराज्य तर शिवछत्रपतींनी तर मोठ्या ताकदीने करायला सुरुवात केली. पण त्या स्वराज्याच स्वातंत्र्यात रूपांतर झाल्या नंतर त्याची सुराज्य करण्याची जबाबदारी ज्यांनी आपल्या समर्थ खांद्यावर पेलली असे डॉ. कलाम यांच्याशिवाय दुसरे आहे तरी कोण. त्यामुळे आपल्या ऐतिहासिक मालिकेचा शेवट करण्यासाठी याहून कोणी दुसरे जबाबदार व्यक्तिमत्व शोधून हि सापडणार नाही.
डॉ. कलाम यांना नव्या तंत्रज्ञान भारताचे जनक म्हणायला हरकत नाही. कारण भारताला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध करण्यात डॉ. कलाम यांचा सिंहाचा वाटा आहे. मानवी इतिहासाचा जर आपण नीट विचार केला तर मानवी इतिहासात माणूस हा प्रत्येक लढाई साठी सिद्ध असतो. सुरुवातीच्या काळात मानवी टोळ्यांमध्ये अन्न आणि निवारा साठी युद्ध होत. मग पुढे धर्मावरून युद्ध सुरू झाले. आताचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे. प्रत्येक देश तंत्रज्ञानाच्या जोरावर एकमेकांवर वर्चस्व गाजू पाहतोय.
मग सव्वाशे करोड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तंत्र ज्ञान अतिशय गरजेचं होतं. हि सिद्धता करायची कला कलामांनी ठरवली. आणि आज भारत क्षेपणास्त्रामध्ये तोडीच तोड आहे. हि जिद्द आली कुठून, हि भावना येते कुठून, सर्वसामान्य भारतीय मुलासारखे वाढलेले ,ज्यांना अन्न वस्त्र निवारा ची कमतरता नाहीये, पण त्या हि पलीकडे लागतं ते प्रत्येकाला मिळत नाही. शिक्षणासाठी मैलोमैल चालत जाणं हे त्यांच्याही नशिबी आलं.
भेदभाव त्यांनीही सहन केला. अपेक्षा भंग त्यांच्याही झाल्या. पण ते ह्या सगळ्या पलीकडे होते. या आत्मचरित्रात ते एका बाजूला व्यक्तिगत आणि व्यवसायिक संघर्ष चित्र साकारलेलं आहे. पण त्याच सोबत अग्नी आकाश पृथ्वी त्रिशूल नाग अशी नावे घरोघरी पोहोचलेल्या क्षेपणास्त्रांची जडणघडण सुद्धा सांगितलेली आहे.
या आत्मचरित्राच्या माध्यमातून कलमांच्या जीवनातील व्यक्तिगत गोष्टी करतात पण त्याच सोबत त्यांचा संदर्भ घेऊन त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल कल्पना येते. डॉ. कलाम हे आधुनिक भारतातील धर्मनिरपेक्षेच अग्रणी उदाहरण आहे. रामेश्वरम ह्या हिंदू क्षेत्रात त्यांचा जन्म झाला असला तरी ते स्वतः मुस्लिम धर्माचे होते. पण या दोनहि धर्मांचा सुंदर मिळाव जुळवून देण्याचा अनेक प्रसंग त्यांच्या जीवनात आले. रामेश्वरम तीर्थ क्षेत्राचे पुजारी आणि डॉ. कलाम यांचे बाबा जे एका मशिदीत प्रार्थना दूत होते ह्या दोघांचे मित्रताची घनिष्ट नाते होते.
डॉ. कलाम यांचा स्वतःचा जवळील शाळेतला मित्र हिंदू होता ते बाकावर एकत्र बसल्याने एका शिक्षकाने त्यांना वेगळं केलं होते. तेव्हा कलाम यांच्या बाबांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाची चांगलीच कानउघाडणी केली होती. अजून एक गोष्ट त्यांच्या लेखनात दिसून येते ती म्हणजे त्यांची ईश्वर परी शक्तीवर निष्ठा होती. विज्ञान निष्ठ असून सुद्धा त्यांचा अहंकार न बाळगता आपण निर्माण केलेली गोष्ट यात आपलं फारसे योगदान नसून ईश्वरी कृपेने झाली असे सांगून स्वतःवरील यशाचा भार कमी करणे त्यांनी केव्हाही पसंद केले. अशा प्रकारचा आदर्शवादी पुरुष इतिहासात क्वचितच आढळेल.
Download Here – Agnipankh Book In Marathi Pdf
हे पुस्तक वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- Click Here – Angnipankh Book In Marathi Pdf Download
आमच्या इतर बुक्स,
- Sambhaji Book Pdf In Marathi Download
- Yayati Marathi Book Free Pdf Download
- Nilavanti Granth Marathi PDF Download
- Mrutyunjay Book PDF In Marathi
- Yugandhar Book Marathi Pdf Download
- Chava Shivaji Sawant Book PDF In Marathi Download
Conclusion – Agnipankh Book Review In Marathi
Agnipankh Book हे पुस्तक एका कष्टकरी-मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या एका सामान्य माणसाचा भारताचे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास आहे आणि हे आत्मचरित्र त्याच्या स्वतःच्या काळातील सर्वात प्रेरणादायी मानले जाते. Agnipankh Book Review In Marathi ही अपवादात्मक प्रतिभा असलेल्या सामान्य व्यक्तीची उत्कृष्ट कथा आहे. तसेच, या पुस्तकात एका दूरदर्शी नेत्याचा प्रवास वर्णन केला आहे ज्याची कृती त्याच्या शब्दांपेक्षा कितीतरी जास्त आहे.
ज्यांना आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी Agnipankh Book हे वाचलेच पाहिजे.
FAQ – Agnipankh Book Review In Marathi
1. अग्निपंख ह्या पुस्तकाचे लेखक कोण?
– डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम .
2. अग्निपंख हे पुस्तक का वाचले पाहिजे?
– या पुस्तकात एका दूरदर्शी नेत्याचा प्रवास वर्णन केला आहे ज्याची कृती त्याच्या शब्दांपेक्षा कितीतरी जास्त आहे. ज्यांना आपल्या देशासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करायचे आहे त्यांनी Agnipankh Book हे वाचलेच पाहिजे.
Thank You.
Team, 360pdfs.com
आमच्या इतर पोस्ट,
- Rich Dad Poor Dad Book Review in Marathi
- Ek Hota Carver Book Review In Marathi
- Ikigai Book Review in Marathi
- The 7 Habits Of Highly Effective People Review in Marathi
- Pavankhind Book Review In Marathi
- Think And Grow Rich Review in Marathi
- Mrityunjay Book Review In Marathi
- Shyamchi Aai Book Review In Marathi
3 thoughts on “अग्निपंख पुस्तक सारांश | Agnipankh Book Review In Marathi”